Rain Forecast : विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.
Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर उन्हाचा चटका देखील कायम आहे. राज्यात पावसाचा पोषक हवामान असल्याने आज (ता. १८) विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, ते कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाचा पोषक हवामान होत असून, ढगाळ हवामान झाले आहे. शनिवारी (ता. १६) दुपारनंतर नांदेड जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्याने पिकांचे नुकसान झाले.
आज (ता. १८) पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, ब्रह्मपुरी येथे पारा ३९ अंशांपार कायम आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाच्या चटका, उकाडा टिकून असून आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाची ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३५.४, धुळे ३६.०, कोल्हापूर ३५.९, महाबळेश्वर ३०, मालेगाव ३७.४, नाशिक ३४.२, निफाड ३३.७, सांगली ३७.१, सातारा ३५.४, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३१.९, डहाणू ३२.६, रत्नागिरी ३१.५,
छत्रपती संभाजीनगर ३६.०, नांदेड ३७.२, परभणी ३६.६, अकोला ३९.२, अमरावती ३७.४, बुलडाणा ३५.५, ब्रह्मपुरी ३९.०, चंद्रपूर ३८.०, गडचिरोली ३६.४, गोंदिया ३६.२, नागपूर ३६.५, वर्धा ३७.८, वाशीम ३८.८, यवतमाळ ३८.०.
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) Rain Forecast :
गोंदिया, चंद्रपूर.
वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) Rain Forecast :
अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली.
श्रोत : agrowon.esakal