कृषी ॲग्रोवन

चार्जिंगच्या फवारणी पंपासाठी अनुदान; पाहून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया…

चार्जिंगच्या फवारणी पंपासाठी अनुदान; पाहून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया...

चार्जिंगच्या फवारणी पंपासाठी अनुदान; पाहून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया…

सोयाबीन तसेच इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

सन २०२४-२५ मध्ये योजनेंमार्फत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपचा अनुदानावर पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर अर्जासाठी दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज जमा करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

तर कसा करता येईल अर्ज?

  • अर्ज करण्यासाठी वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
  • लाभार्थी (शेतकरी) “युजर आयडी व पासवर्ड” तयार करणे.
  • लाभार्थी (शेतकरी) “युजर आयडी व पासवर्ड” टाकून लॉगीन करणे.
  • अर्ज करा या बाबीवर क्लिक करणे.
  • कृषी यांत्रिकीकरण बाबीवर क्लिक करणे.
  • मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे.
  • तपशील बाबीवर क्लिक करून मनुष्यचलित औजारे घटक निवड यंत्र/औजारे व उपकरणे – पिक – संरक्षण औजारे – बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) बाब निवडावी.
  • आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी जतन करून ठेवणे.

टीप:
अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Scroll to Top