कृषी ॲग्रोवन

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : PM किसानच्या 16व्या हप्त्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर शेतकऱ्यांनी कुठे करावी तक्रार?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : PM किसानच्या 16व्या हप्त्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर शेतकऱ्यांनी कुठे करावी तक्रार?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : PM किसानच्या 16व्या हप्त्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर शेतकऱ्यांनी कुठे करावी तक्रार?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळाला नाही. हा हप्ता मिळाला नसेल तर तक्रार कशी आणि कुठे कराल?

देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळाला नाही. हा हप्ता मिळाला नसेल तर तक्रार कशी आणि कुठे कराल? यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी, PM किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याची (PM Kisan 16th Installment) रक्कम देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आली. मात्र, ही रक्कम अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही. जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला असेल, परंतू, या योजनेची रक्कम अद्याप तुमच्या खात्यात आली नसेल, तर तुम्ही तक्रार कुठे कराल.

हे पण वाचा : PM Kisan : ‘पीएम, नमो’ चा हप्ता कधी होईल अखेर जमा!

कुठे कराल तक्रार

जर तुमच्या खात्यात PM किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम अजून आली नसेल, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in वर ई-मेलद्वारे तक्रार करु शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 किंवा 155261 वर कॉल करू शकता किंवा पीएम किसानच्या टीमशी बोलण्यासाठी तुम्ही टोल फ्री 1800-115-526 वर संपर्क साधू शकता.

PM किसानचा 16 हप्ता अद्याप का मिळाला नाही?

जर तुम्हाला अद्याप योजनेची हप्त्याची रक्कम मिळाली नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना हप्त्याची रक्कम मिळणार नाही. तुम्ही नोंदणी फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती भरली असली, तरीही तुम्हाला योजनेची रक्कम मिळणार नाही. तसेच लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसले तरी हप्त्याची रक्कम अडकते. जमिनीची पडताळणीही अनिवार्य आहे. शेतकऱ्याच्या जमिनीची पडताळणी न झाल्यास त्याला योजनेचा लाभ मिळत नाही. चुकीची कागदपत्रे दिली असल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये आले होते. यावेळी त्यांनी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 16 वा हप्ता जारी केला. ही रक्कम 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे पैसे DBT द्वारे PM किसान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले. मात्र, काही शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला नाही.

श्रोत : marathi.abplive

Scroll to Top