Rain Forecast Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा ! वाचा सविस्तर
Rain Forecast Maharashtra : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे थंडी ओसरली आहे. आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रात विजांसह Rain Update पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, रविवारी (ता. ७) राजस्थान मधील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात मात्र थंडी ओसरली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १५ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ८) राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या पोषक स्थितीमुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. Rain Forecast
आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे येथे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. Rain Forecast Maharashtra
हे पण वाचा : PM Kisan : ‘पीएम, नमो’ चा हप्ता कधी होईल अखेर जमा!
रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
छत्रपती संभाजीनगर २७.२ (१४.८), नांदेड २९.६ (१६.६), परभणी २८.७ (१४.४), अकोला २९.० (१७.६), अमरावती २८.० (१५.६), बुलढाणा २७.५ (१६.७), ब्रह्मपूरी २७.२ (१५.९), चंद्रपूर २७.० (१४.४), गडचिरोली २९.० (१४.८), गोंदिया २४.८ (१३.८), नागपूर २५.६(१६.६), वर्धा २६.८(१५.६), वाशीम २८.६ (१७.२), यवतमाळ २९.० (१५.५).
पुणे २९.५ (१५.०), धुळे २६.० (११.२), जळगाव २७.० (१२.४), कोल्हापूर २९.९ (२०.५), महाबळेश्वर २५.६ (१५.०), नाशिक २६.४ (१६.९), निफाड २६.० (१५.४), सांगली ३०.३ (२०.३), सातारा ३०.९ (१७.२), सोलापूर ३२.२(२०.१), सांताक्रूझ ३१.५ (२०.९), डहाणू २७.८ (१९.४), रत्नागिरी ३२.१ (२१.२),
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे.
विजांसह पावसाची शक्यता :
सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना.
श्रोत : कृषी महाराष्ट्र